मालवण शहरात गप्पी मासे सोड मोहीम

मालवण ग्रामिण रुग्णालयाचा उपक्रम

मालवण : (प्रतिनिधी) हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मालवण शहरातील डास उत्पत्ती ठिकाणे डबकी, खड्डे, गटारे आदी पाणी भरलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोड मोहीम सोमवारी राबवण्यात आली. हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची अंडी खाण्यात गप्पी मासे महत्वाची भूमिका बजावत. या माहितीसह डेंग्यू, हत्तीरोग, चिकन गुनीया यासह अन्य किटकजन्य आजाराबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शहरात जनजागृती करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी सुधीर चांदोसकर, कृष्णा माजिक, आरोग्य कर्मचारी सहभागी झाले. फोटो : मालवण शहरात ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गप्पी मासे सोड मोहीम राबविण्यात आली.

You cannot copy content of this page