*💫मालवण दि.२८-:* मालवण ग्रामीण रुग्णालयानजीक असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन कोविड रुग्णांची विचारपूस करीत रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या औषध पुरवठ्याबाबत आढावा घेत ओरोस जिल्हा रुग्णालयाशी फोनद्वारे संपर्क करून कोविड सेंटरच्या मागणीनुसार तात्काळ औषध पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. मालवण ग्रामीण रुग्णालया शेजारी असलेल्या कोविड सेंटरला आम. नाईक यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी आ. नाईक यांना माहिती दिली यावेळी रुग्णांनी आ. नाईक व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे यावेळी आभार मानले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, पंकज सादये, जोगी, तपस्वी मयेकर, प्रसाद आडवणकर आदी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयजवळील कोव्हिड सेंटरला आमदार वैभव नाईक यांनी दिली भेट
