कणकवलीतील १७१३ मतदारानी रंगीत छायाचित्र न दिल्यास मतदानापासून वंचित रहावे लागणार

*💫कणकवली दि.२८-:* कणकवली विधानसभा मतदारसंघांर्तगत कणकवली तालुक्यातील १३७ मतदान केंद्रापैकी ४० मतदान केंद्रातील १७१३ मतदारांचे रंगीत छायाचित्र मतदार यादीत उपलब्ध नाहीत . सदर मतदारांबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून वारंवार गृह भेट देणेत आलेली असून त्यापैकी बहुतांशी मतदार स्थलांतरीत/ मयत असल्याचे आढळून आलेले आहेत . सदर छायाचित्र उपलब्ध नसलेल्या मतदारांची यादी तहसिलदार कार्यालय कणकवली , नगरपंचायत कणकवली , व संबंधित ग्रामपंचयात कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करणेत आली आहे . तरी ज्या मतदारांचे रंगीत छायाचित्र मतदार यादीत नाही त्यांनी २ जुलै २०२१ पर्यंत आपले रंगीत छायाचित्र , आधार कार्ड व रहिवासी पुरावा तहसिलदार कार्यालय कणकवली ( निवडणूक शाखा ) अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करावेत . दिलेल्या मुदतीत आपले छायाचित्र व रहिवासी पुरावा प्राप्त न झाल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील याची नोंद घ्यावी . तसेच जे मतदार विहित मुदतीत छायाचित्र व रहिवासी पुरावा सादर करणेस असमर्थ ठरतील त्यांची मतदार यादीतील नावांची वगळणी केल्यानंतरही त्यांना त्यांच्या सर्वसाधारण रहिवासाचे ठिकाण ( लोकप्रतिनिधित्व अधिनियम १ ९ ५० कलम २० अन्वये ) ज्या विधानसभा मतदारसंघात असेल त्या मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे विहित नमुना क्रमांक ६ दवारे नाव नोंदविण्याचा अर्ज करणेचा हक्क अबाधित राहील .

You cannot copy content of this page