*💫सावंतवाडी दि.२८ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १२ तर ग्रामीण भागात १७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात खासकीलवाडा १, उभाबाजार १, सालईवाडा ३, झीरंग ३, बाहेरचा वाडा ३, जुना बाझार १, तर ग्रामीण भागात बांदा २, डिगणे १, आरोंदा १, न्हावेली १, सातार्डा २, कारीवडे १, चराठा १, तळवडे २, मळगाव १, आंबोली १, फणसवडे ४ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात ४१२ रुग्ण सक्रिय आहेत.
