घंगाळेवाडी रस्त्याला जिल्हा वार्षिक मधून निधी मिळणार

पालकमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन;तालूकाप्रमुख मंगेश लोके यांचे प्रयत्न

*💫वैभववाडी दि.२८-:* कोकिसरे गावातील वैभववाडी तळेरे रस्त्यालगत असलेला घंगाळेवाडी मार्ग आजही दुर्लक्षित आहे. या रस्त्याच्या गैरसोईबद्दल प्रसिद्धी माध्यमांमधून सातत्याने लोकप्रतिनिधींवर टीका होत होती. कालच या समस्ये बाबत बातमी प्रसिद्ध झाली होती त्याची दखल घेऊन शिवसेना तालुकाप्रमूख मंगेश लोके यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.उदयजी सामंत साहेब व लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी पालकमंत्री उदयजी सामंत यांनी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांना स्थानिक ग्रामस्थांच्या समवेत पाहणी करून त्याची माहिती घेतली. त्यावेळी पालकमंत्री महोदय यांनी या रस्त्याला जिल्हा वार्षिक योजनेमधून तात्काळ निधी उपलब्ध करून हे काम मार्गी लावण्यात येईल असे सांगितले. गेली अनेक वर्षे हा रस्ता दुर्लक्षित असल्यामुळे येथील ग्रामस्थांची रस्त्याअभावी गैरसोय होत होती परंतु आता खुद्द पालमंत्री महोदयांनी च लक्ष घातल्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल.

You cannot copy content of this page