*💫कणकवली दि.२६-:* बेळणे खुर्द येथे कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.सरपंच दिक्षा चाळके यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे बेळणे गावांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे . कोरोना लसीकरणासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागत होते.यावेळी तेथे सुद्धा गर्दी केली जात होती . तसेच जाण्यायेण्याचा त्रास होत होता.यामुळे बेळणे सरपंच सरपंच सौ. दीक्षा चाळके यांनी जिल्हा परिषद यांच्यापर्यंत पाठपुरावा केला असून त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे व बेळणे गावात लसिकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे .यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे . यावेळी सरपंच दीक्षा चाळके,ग्रा.सदस्य सुधा चाळके,विशाखा पुजारे तसेच पोलीस पाटील राजेंद्र चाळके , आरोग्य सेवक परब , आरोग्य सेवि का व्ही.बी .मराठे हे उपस्थित होते.
बेळणेत कोरोना प्रतिबंध लसीकरण सुरू
