सिंधूदुर्गनगरी पोलिसांच्यावतीने अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

*💫ओरोस दि.२६-:* जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून शनिवारी ओरोस फाटा येथे जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन असल्याने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आज दुकानदार व ओरोस फाटा येथील नागरिकांना अमली पदार्थ पासून परावृत्त राहण्यासाठी मार्गदर्शन केले. तर पोलीस उपनिरीक्षक अमित गीते यांनी युवकांनी नशे पासून दूर रहावे. पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केले. यावेळी पोलीस कर्मचारी कमलेश पावसकर, नंदकुमार गोसावी, भालचंद्र शिंगाडे उपस्थित होते.

You cannot copy content of this page