विहिरित आढळला मृत बिबटया व कुत्रा

कोनाळकट्टा येथील घटना;कुत्र्याचा पाठलाग करताना बिबटा विहिरित पडल्याची शक्यता

*💫दोडामार्ग दि.२६सुमित दळवी-:* तिलारी कोनाळकट्टा येथे किशोर शेटवे यांच्या विहिरीत बिबट्या व कुत्रा मृत अवस्थेत आढळून आला .कुत्र्याच्या मागावर असलेला बिबटय़ा थेट विहीरीत कोसळल्याने त्याच्यासह कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना तिलारी वसाहत परिसरात घडली आहे. हा प्रकार कळताच स्थानिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. तर वनविभाग अधिका-यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. ही घटना आज सकाळी साडे नऊ वाजता उघड झाली. दरम्यान पाण्यात पोहताना दमल्याने बिबट्यासह कुत्र्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन अधिकारी गजानन पानपट्टे यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page