भंडारी हायस्कूलमध्ये योगदीन साजरा

मालवण : (प्रतिनिधी) भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय मालवण यांच्या वतीने जागतिक योग दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. गत वर्षी व यावर्षी सुद्धा कोरोनामुळे महाविद्यालय बंद आहेत. या पार्श्वभूमीवर भंडारी कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ज्युनिअर कॉलेजच्या सुमारे ५० मुला- मुलींनी उस्फुर्त सहभाग दर्शवला. प्राध्यापक पवन बांदेकर व सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष विजय पाटकर, सेक्रेटरी साबाजी करलकर, प्राचार्य वामन खोत यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page