धारवेर धरल्यानंतर ग्रामस्थाना वीज अधिकाऱ्यांचे आश्वासन
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावात होत असलेल्या अनियमितपणे होत असलेल्या विज पुरवठा संदर्भात आज ओटवणे ग्रामस्थांनी उपअभियंता भुरे व सहाय्यक अभियंता बोथरे याना धारेवर धरत सावंतवाडी मधून वीज जोडणी द्या अन्यथा गणेश उत्सवापूर्वी आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे. अखेर 2 तासाच्या चर्चेनंतर उपअभियंता भुरे यांनी चालू असलेला वीज पुरवठा सुरळीत चालू राहील याकडे स्वतः लक्ष घालीन आणि 2 दिवसात सर्वे करून सावंतवाडीतुन तातडीने वीज जोडणी देण्यास प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी ग्रामस्थांनी उपअभियंता भुरे यांच्याकडे निवेदन दिले. गावात सुरु असलेल्या अनियमित विज पुरवठा संदर्भात ओटवणे ग्रामस्थांच्या शिष्ट मंडळाने वीज वितरण सावंतवाडी कार्यालयात आज धडक दिली. यावेळी वीज प्रश्नासंदर्भात उपअभियंता भुरे व सहाय्यक अभियंता बोथरे याना धारेवर धरले. यावेळी ओटवणे गावाला सावंतवाडी मधून वीज जोडणी देण्याची मागणी करण्यात आली. सावंतवाडीतून जोडणी न दिल्यास गणेश उत्सवापूर्वी आंदोलन छेडण्याच इशारा यावेळी देण्यात आला. अधिकाऱ्यांनी आपली वेळ मारून नेत थातुर मातुर उत्तरे देताच. ग्रामस्थांनी आक्रमक होत तुम्ही कारणे सांगू नका, वीज समस्या सोडवणार कि जमणार नाही ते सांगा असे खडे बोल रवींद्र म्हापसेकर यांनी सुनावले. तर तुमच्या अडचणी गेली दहा वर्ष ऐकतोय आता आम्हाला लेखी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशी मागणी संतोष भैरवकर, सगुण गावकर, संतोष तावडे, संतोष तारी, प्रमोद केळुसकर, भाई गावकर, स्वप्नील म्हापसेकर यांनी केली. यावेळी कायमची वीज बंद करा मग तुम्हाला समाधान मिळेल अशी अधिकारांची खिल्ली उडवत वीज समस्येला सामोरे जाण्याचा संयम सुटला असून आता यापुढें समस्या जाणवल्यास समजूतदार पण सोडावा लागेल अशी समज तावडे यांनी दिली. तर दीपक गावकर , स्वप्नील उपरकर यांनी 2 दिवसात सर्वे करून 24 तास वीज पुरवठा सुरळीत ठेवा आणि तातडीने सावंतवाडी मधून वीज जोडणी करा असे सांगितले. वरिष्ठ अभियंता कुडाळ याना सावंतवडीत बोलावून ग्रामस्थांना चर्चेस बोलवावे अशी मागणी केली. यावर भुरे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
