दोडामार्गातील रस्ते गेले खड्यांत

तीन दिवसांची दुरुस्तीसाठी मुदत अन्यथा बांधकाम विभागाला जाब विचारणार;मदन राणेंचा इशारा

*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यातील रस्ते हे पुर्णपणे खड्डेमय झाले आहे. मुळस ते विजघर हा मार्ग संपुर्ण वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या मार्गावरुन वाहतुक करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने हाकावी लागतात. रस्तात खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न यावेळी वाहनधारकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत व्हावा यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र हा रस्ता मंजूर होवून एक वर्ष उलटल तरी या रस्तावर कोणत्याही प्रकारच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. ठेकेदाराचा दुर्लक्षपणा आणि अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणामुळे याठीकाणी अनेक वेळा अपघातही झाले. या मार्गावरुन वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर होत असते. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. त्याचबरोबर येत्या तीन दिवसांत या मार्गावरील खड्डे न बुजवल्यास बांधकाम विभागात घेराव घातला जाईल व होणाऱ्या परीणामांना सर्वस्वी बांधकाम विभाग जबाबदार राहील असे यावेळी दोडामार्ग तालुका युवा समन्वयक मदन राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page