राष्ट्रवादी काँग्रेस नेते बबन साळगावकर यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवहान
*💫सावंतवाडी दि.२०-:* जिल्ह्यातील राडा संस्कृती मुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन, जिल्हा मागे गेला आहे. त्यामुळे जिल्ह्याला ही राडा संस्कृती परवडणारी नाही. असे मत माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते बबन साळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. गेली अनेक वर्ष जिल्ह्यात सुरू असलेल्या राडा संस्कृती मुळे कै. श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्य विजय भिसे, अंकुश नाईक या नेत्यांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी संयमाने वागून कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या व्यवसाय गेल्याने उपासमारीने मरत असलेल्या जनतेसाठी योगदान द्यावे असे आवाहन साळगांवकर यांनी केले आहे.
