कोरोना हॉटस्पॉट कणकवलीत बाजारपेठेत 3 दिवसात 200 पेक्षा जास्त स्वॅब कलेक्शन

*💫कणकवली दि.२०-:* प्रशासनाने कणकवली शहरातील 17 पैकी 8 प्रभाग कोरोना हॉटस्पॉट जाहीर केल्यानंतर कणकवलीत बाजारपेठेमध्ये गेल्या तीन दिवसात 200 पेक्षा जास्त जणांचे आरटीपीसीआर स्वॅब घेण्यात आले आहेत.कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या या चाचणीला नागरीकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत असून कणकवली शहरात कोरोना रुग्णाची संख्या कमी होताना दिसत आहे. कणकवली बाजारपेठेमध्ये मागील काही दिवसात कोरोनाचे संक्रमण वाढले असल्यामुळे शहरातील बाजारपेठेमध्ये गेल्या तीन दिवसात 200 पेक्षा जास्त जणांचे आरटीपीसीआर स्वॅब घेण्यात आले आहेत.पहिल्या दिवसात 46 दुसऱ्या दिवशी 80 तिसऱ्या 75 व आज दुपार पर्यंत 36 जनांचे स्वॅब घेण्यात आले आहेत त्यांचे रिपोर्ट टप्प्याटप्प्याने येणार असल्याने नेमके संक्रमण किती प्रमाणात आहे हे स्पष्ट होणार आहे. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग व नगर पंचायत तिच्या माध्यमातून नागरिकांना स्वॅब देण्यासाठी कणकवली बाजारपेठ मधील नलावडे हाऊस तेथे येण्याचे आवाहन कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे या स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये उपजिल्हारुग्णालयाचे डॉ.गणेश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक संतोष जाधव ,नगरपंचायतवतीने शहर समन्वयक प्रतिष खैरे ,कर्मचारी सतीश कांबळे, मिथुन ठाणेकर ,विजय चव्हाण ,रुचीर ठाकूर ,संजय राणे, राजू दळवी ,तारक तांबे,राजेश,संदीप मुसळे, जाधव,व पोलीस कर्मचारी उपस्थित होते

You cannot copy content of this page