घरे, गोठा व मंदीर यांच्या भिंती व जमीनीला तडे;लोकांना स्थलांतरीत होण्याच्या तहसीलदारांच्या सुचना
*💫देवगड दि.१७-:* गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीचा फटका देवगड तालुक्यातील पेंढरी गावठणवाडी या गावाला बसला असून येथील घरे, गोठा व मंदीर यांच्या भिंती व जमीनीला तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातील सर्वांना स्थलांतरीत होण्याचा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीने घरांना तडे व भेगा गेल्या यामध्ये रसिका ज्ञानेश्वर गुरव, अनिल सखाराम गुरव, दिपक सीताराम गुरव, शंकर सखाराम गुरव, प्रकाश रामचंद्र गुरव, महादेव दीपाजी गुरव, शैलेजा शैलेश गुरव, दत्ताराम शिवाजी गुरव या आठजणांच्या घरांचा समावेश आहे. तर माणकेश्वर पुनाजी गुरव यांचा गोठा व श्रीदेवी चौंडेश्वरी मंदीर यांच्या भिंती व जमीनीला तडे व भेगा गेल्या आहेत. या घरांची लोकसंख्या ६७ आहे. तहसीलदार मारूती कांबळे यांनी पेंढरी गावठणवाडी येथील तडे व भेगा गेलेल्या घरांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून येथील लोकांना स्थलांतरीत होण्याचा सुचना दिल्या आहेत.
