कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र उद्या

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र उद्या शुक्रवार १८ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. प्रसिद्धी पत्रकात नायर म्हणाले, या लसीकरणावेळी कोणत्याही परिस्थितीत ४५ वर्षाखालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित संस्थाना पाठविण्यात आली असून त्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील ४५ वर्षावरील ज्या नागरिकांना कोविशील्ड लसीचा दुसरा डोस देय आहे तसेच ज्यांना पहिला डोस घेतल्यावर ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांनी उद्या लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही नायर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page