नांदगाव वरचीमुस्लिवाडी येथील विहीर साफसफाई करा

सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी वेधले लक्ष

*💫कणकवली दि.१८-:* नांदगाव येथील वरची मुस्लिवाडी येथील सार्वजनिक विहिरीची साफसफाई करावी अशी वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. हि विहीर आहे कि डबका अशी विहिरीची अवस्था झाली आहे.या विहीरीची साफसफाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी केली आहे. नांदगाव येथील ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत यांना वेळोवेळी हि विहीर साफसफाई व त्याच्यावर झाकण घालावे असे वारंवार सांगत असतानाच या रोजच्या पिण्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले आहे. या विहिरीमध्ये लहान मोठी झाडी, पालापाचोळा जमा झाला आहे. हि विहीर झाडाझुडपांनी भरडलेली आहे. स्थानिक ग्रामस्थ व दुकानदार ,हाॅटेलवाले या पाण्याचा वापर करतात. या विहिरीवर सर्व अवलंबून आहे आम्ही वेळोवेळी नांदगाव ग्रामपंचायतला विहीर साफसफाई करून स्वछ पाणी येथील जनतेला दयावे ,अशी मागणी केली परंतु दुर्लक्ष केले गेले आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही व आरोग्य बिघडले तर याला नांदगाव ग्रामपंचायत जवाबदार राहणार आहे. दरवषी या विहीरीच्या साफसफाईकडे दुर्लक्ष का करतात ? नांदगाव ग्रामपंचायतीकडे निधी नाही का? पाण्यासारख्या विषयाकडे दुर्लक्ष का करतात ? लोकांना स्वछ पाणी दयावे आरोग्य चागले राहावे याकडे लक्ष केंद्रित करावे . नांदगाव ग्रामपंचायत यांनी हि विहीर साफसफाई करून स्वछ पाणी दयावे अशी मागणी येथील ग्रामस्थ यांची आहे. त्वरीत निर्णय घेवून हि विहीर साफसफाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले केली आहे.

You cannot copy content of this page