*युवक आक्रमक; बीएसएनएल कार्यालयाला धडक
सावंतवाडी : दाणोली बाजारपेठेत गेले दोन दिवस वीज पुरवठ्यासह मोबाईल नेटवर्क पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने येथील युवक आज चांगलेच आक्रमक झाले होते. गेले २ महिने वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून व्यापारी वर्गाच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच व्यवसाय ठप्प आहे, अशातच हे नुकसान देखील सहन कराव लागत आहे. वारंवार होणाऱ्या त्रासामुळे संतप्त झालेल्या युवकांनी उप कार्यकारी अभियंता एस एस भुरे यांची भेट घेतली. यावेळी सोमवार पर्यंत हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन अभियंतांनी दिले आहे. दरम्यान, मोबाईल नेटवर्क पुरवठा खंडित होत असल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंबंधी बीएसएनएलचा अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी अजिंक्य सुकी, दिप्तेश सुकी, दुर्वा सुकी, तेजस स्वार, कौस्तुभ नार्वेकर, प्रसाद सुकी, चेतन सुकी, प्रिया सुकी, वसंत बिले, यश सुकी, नितेश सुकी, निहाल शिरसाठ, सुदेश पा़ंगम आदी उपस्थित होते.
