102 वयाच्या आजीला जयेंद्र रावराणे यांनी दिल्या शुभेच्छा
*💫वैभववाडी दि.१७-:* कोरोनावर मात करीत ठणठणीत बऱ्या झालेल्या आणि वयाची 102 वर्षे गाठलेल्या श्रीमती सुमती शिवराम घुगरे या आजीबाईंचा ग माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. घुगरे आजीने या निमित्ताने एक वेगळा आदर्श देताना कोरोनापासून बचाव होऊ शकतो हे दाखवून दिले आहे. तिरवडे तर्फ खारेपाटण येथील श्रीमती सुमती शिवराम घुगरे या 102 वर्षीय आजीने कोरोनावर मात केल्याची बातमी आ. नितेश राणे यांना समजताच त्यांनी आनंद व्यक्त केला. भाजपा पदाधिकारी जयेंद्र रावराणे यांच्याशी संपर्क साधत, त्या आजींचा सत्कार करण्याचे सुचविले. तसेच पुढील काळात त्यांना लागणारी औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गुरुवारी सकाळी जयेंद्र रावराणे हे डॉक्टरांची टीम घेऊन तिरवडे तर्फ खारेपाटण गावात पोहोचले. व त्या वयोवृद्ध आजीचा त्यांनी सत्कार केला. तसेच डॉक्टरांनी त्या आजींची आरोग्य तपासणी केली. यावेळी माजी नगरसेवक संजय सावंत, सरपंच योगेश पाथरे, डॉ. मिताली मोडक, डॉ. करण पाटील, आरोग्य विस्तार अधिकारी आनंद चव्हाण, श्री गवस, मिठबावकर, बी. एम. चव्हाण व नातेवाईक उपस्थित होते. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर शतक गाठलेल्या आजीने कोरोनाला हरवले आहे. या महामारीत हा सर्वांसमोर एक चांगला आदर्श आहे. त्यामुळे कोरोनाला कोणीही घाबरून नये. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा. लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा असे आवाहन जयेंद्र रावराणे यांनी केले आहे.
