*💫वैभववाडी दि.१७-:* वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. सोनाळी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. लसीकरण केंद्र सुरू झाल्याने याचा फायदा सोनाळीसह कुंभवडे येथील ग्रामस्थांना होणार आहे. सोनाळी गावातील लसीकरण केंद्र शुभारंभप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, आरोग्य विस्तार अधिकारी आनंद चव्हाण, सोनाळी सरपंच भिमराव भोसले, प्रमोद सावंत, राजेंद्र रावराणे, ग्रामसेवक गजानन कोलते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सोनाळी येथे उपसभापती अरविंद रावराणे यांनी केला लसीकरण केंद्राचा शुभारंभ
