सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्व पक्षीय नेत्यांची मागणी
*💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कोरोना काळात तसेच तोक्ते चक्रीवादळ, महापूर मध्ये झोकून देत रात्र दिवस केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची शासकीय निकषानुसार होणारी बदली स्थगित करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्व पक्षीय नेत्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन ईमेल द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आले आहे.
