फुटवेअर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या

सुजित जाधव यांनी पालकमंत्री व खासदार यांचे लक्ष वेधले

*💫कणकवली दि.१७-:* पावसाळी गम बूट, सेफ्टी बूट, प्लास्टिक चप्पल याची विक्री करण्यासाठी प्लास्टिक कागद, छत्री यांना ज्या प्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. तशी अत्यावश्यक सेवा म्हणून सदर दुकांनेही सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा फुटवेअरचे अध्यक्ष सुजित जाधव यांनी पालकमंत्री उदय सामंत तसेच खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळा सुरू झाला असल्याने शेतकरी, बांधकाम कामगार तसेच जनतेला पावसाळी गम बूट, सेफ्टी बूट, प्लास्टिक चप्पलची आवश्यकता भासत आहे. सध्या कोरोना काळात फुटवेअर दुकाने बंद आहेत. त्यामुळे शेतकरी, बांधकाम कामगार यांना गरज असून सुद्धा पुरवठा करता येत नाही. तरी परवानगी द्यावी अशी मागणी सुजित जाधव यांनी केली आहे.

You cannot copy content of this page