पाडलोसमध्ये तिलारी कालव्याचे अधिकारी धारेवर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ – उद्या होणार भरपाईचा निर्णय
*💫बांदा दि.१७-:* पाण्याच्या प्रवाहाची भौगोलिक परिस्थिती अधिकाऱ्यांना सांगूनही दुर्लक्ष केल्यामुळे वर्षभरासाठी लागणाऱ्या पोटगीला आम्हाला मुकावे लागणार आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच आपल्या शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जाणूनबुजून केलेल्या नुकसानीची भरपाई आम्हाला तात्काळ द्यावी अन्यथा आम्ही सहकुटुंब याच ठिकाणी चिखलात बसून उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकरी राजू माधव यांनी तिलारी कालव्याचे कनिष्ठ अभियंता महेंद्र डांबरेकर यांना दिला. तर झालेले नुकसान मान्य करत नुकसानग्रस्त शेतकऱ्याना भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असून दोन दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून नुकसानीचा निर्णय घेऊ असे श्री.डांबरेकर यांनी सांगितले.
