*💫बांदा दि.१७-:* विद्यार्थी हिताय, राज्यस्तरीय समूह बालसंस्कार, आयोजित राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये बांदा केंद्र शाळेचा, इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर यांने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थ्यांमधून 250 आणि त्यातून टॉप-21 मध्ये येण्याचा बहुमान पटकावला आहे. यामध्ये संपूर्ण राज्यातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सिंधुदुर्गातून निवड झालेला नील बांदेकर हा एकमेव विद्यार्थी आहे . त्याचे मामा सिंधुदुर्गातील प्रसिद्ध चाईल्ड स्पेशालिस्ट उमेश सावंत हे त्याचे हस्ताक्षर गुरु आहेत. त्याच बरोबर त्याला बांदा केंद्र शाळेतील शिक्षक वृंद, तसेच मुख्याध्यापिका सरोज नाईक आणि जे. डी पाटील सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. नीलने यापूर्वी अनेक स्पर्धातून यश संपादन केलेआहे. विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत नील बांदेकर “टॉप ट्वेंटी वन” मध्ये
