देवगड तालुक्यात मुसळधार पाऊस…

नदीनाल्यांना पूर आला तर वाडा चांभारघाटी येथे पाण्याच्या लोंढामुळे विजयदूर्ग मार्ग ठप्प

*💫देवगड दि.१६-:* देवगड तालुक्यात बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला. या मुसळधार पावसाने तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला असून वाडा चांभारघाटी येथे पाण्याच्या लोंढामुळे विजयदूर्ग मार्ग ठप्प झाला होता तर दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारीवर्गाची देखील तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे दहिबांव, नारींग्रे पुलही पाण्याखाली गेल्यामुळे येथील वाहतुक देखील काहि तास बंद होती. देवगड तालुक्यात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हाहाकार उडविला.वाडा चांभारघाटी परिसरात पाणी साचल्याने पुर्ण परिसर जलमय झाला.वाडा विजयदूर्ग व वाडा नाडण या मार्गावरील वाहतुक पुर्णत: ठप्प झाली.शेतीमध्येही पाणी शिरले.तालुक्यात ठिकठिकाणी मोठया प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती.सर्वाधिक १५० मिमी पावसाची नोंद झाली असून .दहिबांव नारींग्रे पुलावर पाणी आले यामुळे वाहतुक ठप्प झाली होती.

You cannot copy content of this page