पहिल्याच पावसात कास देऊळवाडी रस्त्याचे डांबरीकरण खचले

ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्टच्या माध्यमातून अमित वेंगुर्लेकर करणार चौकशीची मागणी

*💫सावंतवाडी दि.१६-:* मडुरा कास येथील देऊळवाडी ते कीनलेकरवाडी या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले आहे. परंतु पहिल्याच पावसात महिन्याभरातच सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण खचू लागले आहे. त्यामुळे आज भारत गॅस कंपनीची सिलेंडरची अत्यावश्यक सेवा देणारे वाहन संबंधित रस्त्याच्या कमकुवत डांबरी कारणामुळे चार तास अडकून राहिले होते. ग्रामस्थांचे ही आत्यवश्याक सेवेत व्यत्यय आल्याने हाल झाले आहेत. यासंदर्भात ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट चे प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांना स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिली. यावेळी सदर रस्ता डांबरीकरणाचे झालेले काम हे पहिल्याच पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासारखे झाले आहे. तसेच सद्य कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत गावात अत्यावश्यक सेवेकरिता रुग्णवाहिकेची गरज भासल्यास आजच्या सारखा प्रसंग घडला तर येथील स्थानिक ग्रामस्थांनी काय करावे ? असा प्रश्न अमित वेंगुर्लेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच वेंगुर्लेकर यांनी संबंधित रस्ता डांबरीकरण करण्यात आलेल्या कामाची पाहणी करून तातडीने योग्य ती चौकशी करण्यात यावी या करिता योग्य त्या शासकीय कार्यालयात अर्ज दाखल करणार असल्याचे श्री अमित वेंगुर्लेकर यांनी तेथील उपस्थित ग्रामस्थांना भेटून आश्वासन दिले आहे.

You cannot copy content of this page