मातोश्री ट्रस्टचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने वाटप
*💫कुडाळ दि.१६-:* कसाल ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनानुसार जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने आज मनसे नेते मातोश्री ट्रस्टचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड उपचारासाठी लागणारी औषधे, पीपीई किट, फेस मास्क, फेस शिल्ड व सॅनिटायझर वस्तू प्रदान करण्यात आल्या. तसेच मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्यावतीने कोविड अलीगीकरण कक्षासाठी रोख १०,०००/- राघोजी कदम यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ शालिनी कोकरे, उपसरपंच श्री दत्ताराम सावंत, श्री संतोष राणे तसेच माझं गाव कसाल कोरोना मुक्त अभियान टास्क टीम श्री यशवंत परब , श्री अवधूत मालणकर ,श्री बाळा कांदळकर श्री प्रकाश नारकर, ट्रस्टचे संदीप परब, माजी तालुका अध्यक्ष श्री. गणेश वाईरकर, मनसे शाखा अध्यक्ष श्री अनिल कसालकर, श्री मंगेश कसालकर, नीतेश लाड, सुशांत कसालकर, पृथ्वीराज येरूणकर, आदिल शहा व गावातील मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात तातडीने मनसेमार्फत मदत पोहचल्यामुळे सर्वत्र मनसेचे कौतुक होत आहे. यावेळी ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी राज ठाकरे, मनोज।चव्हाण,।गणेश कदम, धिरज परब, राघोजी कदम, अनिल कसालकर यांचे आभार मानले.
