गुरे आडवी आल्याने अपघात
*💫कणकवली दि.१६-:* मुंबई गोवा महामार्गावरून मोटरसायकलने जात असताना जानवली येथे घडलेल्या अपघातात रोहित रूपेश कपाले (वय २५, रा.कासार्डे, जांभुळवाडी) हा मोटरसायकलस्वार युवक ठार झाला आहे.सदर अपघात महामार्गावर गुरे आडवी आल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. मात्र अपघात कसा झाला याबाबत तर्कवितर्क सुरू होते. मुंबई गोवा महामार्गावरील जानवली येथे हा अपघात दुपारी दुपारी दीडच्या सुमारास घडला.मुंबई गोवा महामार्गावरून जात असताना महामार्गावर अचानक गुरे आडवी आली. या गुरांना धडकून रोहित महामार्गृावर पडला असल्याचे समजते. याच दरम्यान कणकवलीच्या दिशेने येणार्या रूग्णवाहिका चालकाला रस्त्यालगत कोसळलेला तरूण आढळला होता. जखमी अवस्थेतील रोहित कपाले याला रूग्णवाहिका चालक गुरूनाथ मेस्त्री (रा.शिरवल) याने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिस तपासामध्ये हा तरूण कासार्डे येथील असल्याचे निष्पन्न झाले. कणकवलीत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असून वाहतूकीचे प्रमाणही कमी झाले आहे.त्यामुळे रोहित अपघातानंतर किती वेळ रस्त्यावर जखमी अवस्थेत होता हे समजू शकले नाही.
