Headlines

कट्टा, वराड गावात प्रशासन दाखल

वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर दिली भेट;रुग्ण वाढलेला भाग कन्टेन्टमेंट करून टेस्ट वाढविण्याच्या केल्या सूचना

*💫मालवण दि.१६-:* मालवण तालुक्यातील कट्टा व वराड या भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने आज प्रशासनाकडून या कट्टा गावाला भेट देऊन आढावा घेण्यात आला. कट्टा वराड येथे ज्या भागात जास्त रुग्ण सापडत आहेत त्या भागाला कंटेन्मेंट झोन करून तेथील स्वॅब टेस्टिंग वाढवावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली आहे. मालवण तालुक्यात गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्ण संख्येत दिवसागणित लक्षणीय वाढ असून कट्टा वराड परिसरात मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण सापडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाकडून कट्टा वरची गुरामवाड ग्रामपंचायतीत या भागातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. कट्टा परिसरात अजूनही कोरोना रुग्ण सापडत आहेत. ज्या भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे असा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करून तेथे कोरोना नियमांची अंमलबजावणी करावी. तसेच तेथील स्वॅब टेस्टिंग वाढवावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली. यावेळी वराड गावालाही भेट देऊन तेथील लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहिमेचा देखील आढावा घेण्यात आल्याचे तहसीलदार पाटणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page