कडक बंदोबस्त असताना सुद्धा गोवा बनावटीची दारू ओसरगावपर्यंत कशी पोहोचते

*गुरुदास गवंडे यांचा प्रसिद्धीपत्रकातून सवाल

*💫सावंतवाडी दि.१६-:* महाराष्ट्र व गोवा हद्दीवर कडक बंदोबस्त असतानाही गोवा बनावटीची दारू ओसरगाव पर्यंत कशी काय पोहोचते, असा सवाल मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात यांनी केला आहे. प्रसिद्धीपत्रकात गवंडे यांनी म्हटले की, कडक लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात सर्रास गोवा बनावटीची दारू जिल्ह्यातून अनेक मार्गातून बाहेर जात आहे. तसेच काही चार चाकी गाड्यांच्या काचा ह्या ब्लॅक असून त्याच्या मधून मोठ्या प्रमाणात दारू निघते, असा आमचा अंदाज आहे. आम्ही सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनाही यापूर्वी निवेदन दिलं होतं की सावंतवाडी तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी चेक पोस्ट आहेत त्या त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवा, परंतु काही ठिकाणी तर सर्रास दारू सीमेवरून बाहेर निघते. राज्याच्या सीमा बंद असताना दारूचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे या घटनेची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे, असे गवंडे यांनी म्हटले आहे

You cannot copy content of this page