वेळ पडल्यास विनालक्षणे कोरोना चाचण्या थांबवणार:संदिप मेस्त्री
*💫कणकवली दि.१७-:* कलमठ गाव कोरोनामुक्त होण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून ग्राम नियंत्रण समिती मेहनत घेत आहे, त्यात आम्ही नक्की यश मिळवू मात्र फ़क्त आपले टार्गेट पूर्ण करण्याच्या आततायीपणाला कलमठ गावास वेठीस धरु देणार नाही, वेळ पडल्यास विनालक्षणे कोरोना चाचण्या थांबवू असे कलमठ ग्रामपंचायत सदस्य संदिप मेस्त्री म्हणाले. कलमठ गावात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या शेकडोच्या घरात असताना देखील प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्षपणा आहे. गावात ग्रामविकास अधिकारी प्रभारी असून पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी उपलब्ध होऊ शकत नाहीत, एक आरोग्यसेवक कलमठ-जानवली साठी असून दोन्ही गाव कोरोनाचे हॉटस्पॉट गाव असल्याने एका आरोग्यसेवकांवर ताण पडत आहे. गेले दोन दिवस कलमठ गावात २६० स्वँब तपासणी झाल्या त्यासाठी देखील ग्रामपंचायतने पूर्ण सहकार्य आरोग्य यंत्रणेला केले. मात्र पोलिसांची रोज एक फेरी कलमठ मध्ये व्हावी, स्वँब तपासणी ठिकाणी सोबत होमगार्ड द्यावा, विलगिकरण कक्षसाठी होमगार्ड द्यावा, ग्राम नियंत्रण समितीचे लसिकरण व्हावे यासाठी वारंवार मागणी केली. मात्र कलमठ गावाकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. १२, १३ तारीख पासुनचे तपासणी केलेले रिपोर्ट देखील अजुन प्राप्त नसून गावात काम करताना अडचणीचे होत आहे, एका आरोग्यसेवकाला कोरोनाग्रसस्त घराना भेट देणे, औषधे वाटप करणे, विलगिकरण कक्षातिल कोरोना रुग्नांची हालचाल ठेवणे, आणी आता घरोघरी स्वँब घेणे हे सर्व करताना तारेवरची कसरत होत आहे, हॉटस्पॉट गाव असून देखील गावची नियंत्रण समितिच्या तरुण सदस्यांचे लसिकरण देखील झाले नाहीय. अश्या वेळी वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक वेळी ५० पेक्षा जास्त लसींचा साठा शिल्लक राहतो त्यात तरी कलमठ- वरवडे गावातील नियंत्रण समितीच्या सदस्यांचे लसिकरण का होत नाही? असा प्रश्न यावेळी संदीप मेस्त्री यांनी उपस्थित केला आहे.
