तालुक्यात शेतीच्या कामांना वेग

*नांगरणी, भात पेरणी आदी कामांना जोर

*💫सावंतवाडी दि.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या पावसास सुरुवात झाली असून गेले दोन दिवस मुसळधार पाऊस बरसल्याने गावागावात शेतीच्या कामांना वेग आला आहे. ट्रॅक्टर व बैलांच्या सहाय्याने नांगरणी, भात पेरणी आदी कामांनी जोर धरला आहे. मान्सूनच्या पावसास मुसळधार सुरुवात झाली आहे. गेले दोन ते तीन दिवस संततधार पाऊस सुरू असल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे नांगरणी, भात पेरणी आदी कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व भात पेरणी केली असल्याने तरवा काढणी व भात लावणीच्या कामात शेतकरी व्यस्त झाले आहेत. शेतीच्या या कामात मोठ्यांसोबत लहान मुलेही आवडीने सहभागी झाली आहेत.

You cannot copy content of this page