*💫वेंगुर्ले दि.१५-:* चालू शैक्षणिक नवीन वर्ष सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी वेतोरे हायस्कूल मुलांच्या स्वागतासाठी इमारतीला आकर्षक घेऊन सज्ज झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ यावर्षी १५ जून २०२१ पासून सुरू होत असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यादृष्टीने वेंगुर्ले तालुक्यातील श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे मुलांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून मुलांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत शाळा आहे.कोरोना विषाणूच्या महामारी ने जागतिक संकट मार्च दोन हजार वीस पासून सुरू झाले. आजही हे संकट सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे कोरोना कालावधीत सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने गेले वर्षभर सुरू आहे ऑनलाइन पेक्षा प्रत्यक्षात कोणत्याही कामाला सुरुवात करताना मिळणारा आनंद हा निश्चितच वेगळा असतो मग ते क्षेत्र शैक्षणिक असो राजकीय, क्रीडा किंवा धार्मिक असो शिक्षणाच्या अनुषंगाने आज पासून नवीन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू होणार असल्याने शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सुद्धा सज्ज झाल्या आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे या प्रशालेच्या इमारतीला आकर्षक रंग काढून सज्ज झाली असून मुलांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहे ही ज्ञानदानाची मंदिर असणारी शाळा नाविन्यपूर्ण लक्षवेधी रंगरंगोटीने अप्रतिम देखणी शाळा झाली आहे.
वेतोरे हायस्कूल सुसज्ज:मुलांची प्रतीक्षा
