संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत…

पावसामुळे नदी, नाले तुडुंब_

*💫सावंतवाडी-:* गेले दोन दिवस कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मळेवाड, आरोंदा, तळवणे, कोंडुरे परिसरातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी घुसल्याने नुकतीच पेरणी केलेल्या शेतीचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी पुलावर पाणी आल्याने अनेक गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी गटाराचे पाणी शेती बागायतीत शिरून नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page