युवसेनेच्यावतीने खासदारांना निवेदन
*💫वेंगुर्ले दि.१३-:* आजगाव येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे युवा सेनेतर्फे खासदार यांना निवेदन देण्यात आले. आजगाव येथिल बी एस एन एल मोबाईल टॉवरचे काम पुर्ण होऊन बंद स्थितीत आहे त्यामुळे आजगाव, धाकोरे, मळेवाड, कोंडुरा आदी भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या गैरसोई बाबत वारंवार निवेदने देण्यात आली भारतीय दूरसंचार विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याने युवासेनेचे अध्यक्ष सागर नानोसकर यांनी मोबाईल टॉवर संदर्भात खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन संबंधित टावर चालू करण्यात यावा यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले. खासदार खासदार राऊत यांनी भारत संचार निगम लिमिटेड कार्यालयातील अधिकार्यांशी संपर्क साधला असता टॉवर लवकरसुरू करण्यात येईल असे आश्वासन अधिकार्यांनी दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, सागर नानोस्कर, सचिन सावंत, अतुल बंगे, संतोष शिरसाट आदी उपस्थित होते.
