*💫कणकवली दि.१३-:* कणकवली तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत कार्यालय इमारतीच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या सभामंडप कामाचा शुभारंभ तथा भूमिपूजन सिंधुदुर्ग जि.प.चे माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी कणकवली पं. स. माजी सभापती दिलीप तळेकर,पं. स.सदस्या तृप्ती माळवदे,नडगीवे गावचे सरपंच अमित मांजरेकर,उपसरपंच अरुण कर्ले,चिंचवली उपसरपंच अनिल पेडणेकर,चिंचवली गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा भाजप खारेपाटण शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,चिंचवली पोलीस पाटील दिगंबर भालेकर,ग्रामपंचायत सदस्य तुकाराम गुरव,श्रीम.सत्यवती गवाणकर,ग्रामसेवक गिरिष धुमाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते चिंचवली ग्रामपंचायत कार्यालय येथे शासनाच्या १४ व्या वित्त आयोगातून हा सभामंडप बांधण्यात येणार असल्याचे चिंचवली ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले.
चिंचवली ग्रामपंचायत आवारात सभामंडप कामाचे बाळा जठार यांच्या हस्ते भूमिपूजन
