बांदिवडे गावच्या माजी उपसारपंचांचे अल्पशा आजाराने निधन

मालवण (प्रतिनिधी) बांदिवडे गावचे माजी उपसरपंच बलदेव पुरुषोत्तम प्रभू (वय ७७) यांचे अल्प आजाराने उपचारादरम्यान शनिवारी निधन झाले. गावच्या धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. बांदिवडे देवस्थानचे ते मानकरी होते. गावच्या तंटामुक्त समितीचे ते माजी अध्यक्ष, तर हरिनाम सप्ताह मंडळाचे ते सचिव होते. भाऊ या टोपण नावाने ते ओळखले जात गरिबांचे ते दाते होते. गावच्या विविध विकासात्मक प्रश्नांबाबत त्यांनी शासन दरबारी आवाज उठविला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page