*💫कणकवली दि.०८-:* कणकवली येथील माधुरी महेंद्र प्रतिष्ठानतर्फे कोरोना दक्षतेचा उपाय म्हणून कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सीजन मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. आॅक्सिजनची सिलिंडर, व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ लागलेत . पण, मास्क उपलब्ध होत नसल्याचे जाणवल्याने हे वाटप करण्यात आल्याचे प्रतिष्ठानमार्फत प्राचार्य महेंद्र नाटेकर यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चांद शिकलगार यांच्याकडे मास्क सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संदीप नाटेकर, डॉ. प्रतिमा नाटेकर, विश्वनाथ केरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी अशोक नारकर आदी उपस्थित होते .
माधुरी महेंद्र प्रतिष्ठानतर्फे कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे मास्क वाटप…
