रुग्ण वाहिकेसाठी उग्र आंदोलन करणार

बांदा सरपंच अक्रम खान;रुग्ण वाहिका अर्ध्यावरुन माघारी बोलाविल्याने नाराजी

*💫बांदा दि.०८-:* बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आलेली रुग्णवाहिका पालकमंत्र्याच्या हट्टापायी जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्ध्यावरून माघारी नेली आहे. असा आरोप बांदा सरपंच अक्रम खान यांनी केला आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असताना, जिल्ह्यात असलेल्या नव्या रुग्णवाहिका पावसात उभ्या आहेत. काल जिल्हा परिषद सदस्यांचा हस्ते या रुग्णवाहिकांच लोकार्पण करण्यात आले. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावे पासिंग सुद्धा करण्यात आले. मात्र, त्यानंतर अर्ध्यावरून ही रूग्णवाहिका जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत माघारी मागवण्यात आली. आजचा परिस्थितीत लोकांचे जीव जात आहेत. रुग्णवाहिका मिळत नाही म्हणून रुग्णांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत हा जो प्रकार घडला आहे, तो दुर्दैवी आहे. त्यामुळे अनर्थ घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार हे पालकमंत्री असतील असा आरोप बांदा सरपंच अक्रम खान यांनी केला आहे. तर पालकमंत्र्यांचा हट्टापायी रूग्णवाहिका न मिळुन रूग्णांची हेळसांड झाल्यास गप्प बसणार नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देत रुग्णवाहिका ताब्यात न दिल्यास उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा अक्रम खान यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page