वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत उद्या बैठक…

⚡सावंतवाडी ता.०४-: शहरातील वाढत्या वीज समस्यांच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक ५ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता काझी शहाबुद्दीन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री. वनमोरे (कुडाळ), तसेच सावंतवाडी अर्बन विभागातील सर्व अभियंते उपस्थित राहणार आहेत. शहरातील नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या वीज समस्यांबाबत सूचना व तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
मे महिन्यातील तीव्र उष्णतेदरम्यान वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले होते. अनेक तक्रारी करूनही संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या उद्देशाने आमदार प्रमोद जठार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
या बैठकीस शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, व्यापारी संघटना, विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सावंतवाडी सभापती आनंद नेवगी तसेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page