⚡कुडाळ ता.०४-: जिल्ह्यातील तरुणांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या रविवारी, दिनांक ७ जून २०२६ रोजी मराठा समाज सभागृहात होणार आहे.
ही स्पर्धा रविवार दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मराठा हॉल, कुडाळ हायस्कूल जवळ, येथे हिणार आहे. वयोगट मर्यादा १८ ते ३५ अशी असून प्रवेश पूर्णपणे मोफत आणि विनामूल्य आहे.
स्पर्धेसाठी Vision Maharashtra 2050, राजकारण आणि समाजकारण : युवकांची भूमिका असे विषय आहेत. यापैकी एक विषयावर बोलायचे आहे. प्रत्येक स्पर्धकाला वक्तृत्वासाठी ४ मिनिटांचा कालावधी दिला जाईल.
या स्पर्धेसाठी पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे रु. १० हजार, ७ हजार, ५ हजार चषकद्वितीय पारितोषिक: अशी रोख पारितोषिके आणि चषक देण्यात येतील.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना ‘सहभाग प्रमाणपत्र’ दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी मंदार शिरसाट (मोबा. क्र. ९९२३७ ४२१२१) यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या वक्तृत्व स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभागी होऊन आपले विचार मांडावेत, असे आवाहन युवासेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
कुडाळमध्ये ‘युवासेना’ तर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा…
