⚡सावंतवाडी, ता.०४-:
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने दिलेल्या कौलाबद्दल पश्चिम बंगालमधील जनतेचे आभार व्यक्त करण्यात आले, अशी प्रतिक्रिया स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला. परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
