धाकोरे येथे १९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१४-: श्री पावणादेवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ,धाकोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ऑन कॉल रक्तदाते संस्था , सिंधुदुर्ग आणि श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट,धाकोरे यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई व श्री देवी पावणादेवी सेवा ट्रस्ट धाकोरे यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराची आयोजन करण्यात आले आहे.
तसेच १८० /- रुपयात चष्मा उपलब्ध करण्यात येणार असून,मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.
त्या नंतर रात्रौ ८:३० वाजता गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ,लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
तरी या शिबिराचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त मुळीक परिवार आणि धाकोरे ग्रामस्थ,श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट धाकोरे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page