वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन..
⚡सावंतवाडी ता.१४-: धाकोरे श्री पावणादेवी वर्धापन दिन सोहळा शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी आयोजित केला असून
मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सकाळी – लघुरुद्र, पुजा होम हवन, महाआरती,दुपारी – महाप्रसाद,सायं भजन तसेच रात्रौ ९:३० वाजता नटवर्य नटसम्राट कै. शंकर मोर्वे प्रस्तुत,मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, मोरे यांचा, चव्हाटा रंगमंच धाकोरे,येथे नाट्य प्रयोग होणार आहे.
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट धाकोरे ,समस्त मुळीक परिवार आणि धाकोरे ग्रामस्थ यांनी केले आहे.
