विशाल परब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन…

⚡सावंतवाडी,ता १४-:
सावंतवाडी शहरातील समाज मंदिर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून जयंती उत्सवाचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला शेकडो भीमसैनिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत परिसर घोषणांनी दणाणून सोडला.
यावेळी भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते मा. विशालजी परब, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोदजी कामत तसेच सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित भीमसैनिकांनी ‘जय भीम’च्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले. मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकात्मतेच्या भावनेत हा जयंती उत्सव सुरू झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

You cannot copy content of this page