कणकवली : पंचायत समिती कणकवली मार्फत सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस अनुदानातून लाभ मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले. सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सन्माननीय दादासाहेब साईल, समाज कल्याण सभापती सन्माननीय श्रीमती रुहिता तांबे, कणकवली सभापती सन्माननीय हर्षदा वाळके, उपसभापती सन्माननीय राजेश सावंत, पंचायत समिती सदस्य सन्माननीय चंद्रहास सावंत, लक्ष्मण गावडे, महेश्वरी चव्हाण, मंजिरी मराठे, राजश्री पवार, सायली कृपाळ, संजना राणे, अक्षता राणे, गटविकास अधिकारी माननीय अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, बालविकास प्रकल्प अधिकारी विक्रमसिंह देशमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल चव्हाण, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज सावंत, विस्तार अधिकारी रामचंद्र शिंदे, प्रमोद ठाकूर, संजय कवटकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. पटकारे तसेच पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादासाहेब साईल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जिल्हा परिषदेमार्फत सन्माननीय खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दर महिन्याच्या दहाव्या तारखेला वर्षभर विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, तसेच लाभार्थ्यांनी मिळालेल्या योजनांचा योग्य वापर करून आपल्या कुटुंबाच्या विकासाला चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी कामत तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय रवींद्र खेबुडकर हे ऑनलाईन व्हीसीद्वारे उपस्थित होते. त्यांनी सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा देत योजनांचा प्रभावी लाभ घेण्याचे आवाहन केले.
