संकल्प प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम…

कणकवली रेल्वे स्टेशनला व्हीलचेअर प्रदान.!

⚡कणकवली ता.११-: रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांच्या सोयीसाठी संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) तर्फे कणकवली रेल्वे स्टेशनवर व्हीलचेअर उपलब्ध करून देत एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमामुळे प्रवासादरम्यान अडचणीत येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गरजू व्यक्तींना स्टेशन परिसरात सुलभ हालचाल करणे शक्य होणार आहे.

यावेळी संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरादअली शेख, सचिव अमोल भोगले, सुजाता भोगले-सावंत, अमोल परब, मनोज सावंत, कणकवली रेल्वे स्टेशनचे इंचार्ज श्री. चिपळूणकर, स्टेशन मास्टर तसेच संकल्प परिवार सदस्य किशोर सोगम आदी मान्यवर उपस्थित होते.

संकल्प प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग ही संस्था गेली १५ वर्षे उद्योजकीय प्रशिक्षण, नवीन उद्योजक घडविणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांतूनही संस्था समाजाशी बांधिलकी जपत कार्य करत आहे.

You cannot copy content of this page