कांदळगाव येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव…

⚡मालवण ता.१०-:
सिद्धार्थ विकास मंडळ व यशोधरा महिला मंडळ, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव बुद्ध विहार कांदळगाव – सम्राट अशोक नगर येथे साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता धम्म ध्वजारोहणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता पूजापाठ व बुद्ध वंदना आयोजित करण्यात येणार असून, सकाळी १०.३० वाजता विद्यार्थी व मान्यवरांची मनोगते सादर होतील. संध्याकाळी ७.३० वाजता प्रमुख आकर्षण म्हणून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळ व त्यापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी प्राचार्य श्री. कैलास राबते सर (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानंतर रात्री ९ वाजता सामुदायिक भोजनाचा कार्यक्रम होणार असून, सर्व धम्म अनुयायी यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page