रघुकुल स्वरविहार’ संस्थेचा १२ ला वर्धापनदिन सोहळा…

कुडाळ : ‘आवर्तन’ अर्थात रघुकुल स्वरविहार’ संस्थेचा वर्धापनदिन सोहळा रविवारी १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत होणार आहे. गायन-वादन, ताल आणि रचनांचा भक्तिपूर्ण संगम या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
या कार्यक्रमात सौ. ईश्वरी तेजम (नूतन परब) तसेच रघुकुल स्वरविहार (सावंतवाडीआणि कुडाळ) येथील विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. त्यांना संवादिनीवर मंगेश मेस्त्री, तबल्यावर अथर्व पिंळणकर यांची साथ लाभणार असून कार्यक्रमाचे निवेदन संजय कात्रे करणार आहेत. हा कार्यक्रम गोठोस्कर यांच्या श्री मंगल कार्यालय, भटवाडी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला असून सर्व संगीतप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page