भरधाव दुचाकीची कारला धडक; दुचाकीस्वार जखमी…

मोबाईलवर बोलताना सुटले नियंत्रण; जाणवली गावठणवाडी येथे अपघात..

⚡कणकवली ता.०९-:
कणकवलीहून तळेरेच्या दिशेने जाणाऱ्या कारला समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसून दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जाणवली गावठणवाडी बसथांब्याजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार कणकवलीहून तळेरेकडे जात होती. त्याचवेळी समोरून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराचा वेग जास्त असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. संबंधित स्वार मोबाईलवर बोलत असल्याचेही सांगितले जात आहे. नियंत्रण सुटल्याने दुचाकी कारच्या डाव्या बाजूस जाऊन आदळली.

या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला असून दुचाकी व कारचे नुकसान झाले आहे. जखमीला तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

You cannot copy content of this page