खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक मतदारसंघात विविध उपक्रम संपन्न…

⚡कणकवली ता.०९-: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री
तथा सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत हरकुळ खुर्द येथील शृंगेश्वर गणेश मंदिरात गणेश याग विधिवत पार पडला. धार्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या यागास स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

त्यानंतर हरकुळ बुद्रुक मतदार संघातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला व पुरुष नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ महिलांना साड्यांचे, तर पुरुषांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, हरकुळ बुद्रुकचे सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर, हरकुळ खुर्दचे उपसरपंच सर्वेश दळवी, शक्ती प्रमुख राजा डिचवलकर, तालुका भाजप कार्यकारिणी सदस्य श्री. सरवणकर, करूळच्या सरपंच सौ. नर, कोंडयेचे सरपंच, तसेच गणेश मंदिर ट्रस्टचे विश्वस्त समीर सावंत व श्रीकांत दळवी यांच्यासह हरकुळ बुद्रुक मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page